'उबाठा' महिला आघाडी चिपळूण तालुकाप्रमुखपदी धनश्री शिंदे

Jul 25, 2024 - 10:03
Jul 25, 2024 - 10:53
 0
'उबाठा' महिला आघाडी चिपळूण तालुकाप्रमुखपदी धनश्री शिंदे

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या माजी सभापती व शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हा संघटक सौ. धनश्री शिंदे यांची महिला आघाडीच्या चिपळूण तालुकाप्रमुखपदी निवड झाली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. त्यांनी सभापतिपदाच्या काळात तालुक्यात चांगले काम केले. महिला संघटक म्हणून त्या कुशल कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना नेते आ. भास्कर जाधव, माजी खा. विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय कदम, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, उपजिल्हाप्रमुख बाळा कदम आदींनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow