'एक दौड आरोग्यासाठी'चे फाटक हायस्कूल मध्ये आयोजन

Jul 25, 2024 - 10:46
 0
'एक दौड आरोग्यासाठी'चे फाटक हायस्कूल मध्ये आयोजन

रत्नागिरी : शिक्षण सप्ताह निमित्त दिनांक 24 जुलै तिसऱ्या दिवशी क्रीडा दिन उपक्रमांतर्गत फाटक हायस्कूल मध्ये एक दौड आरोग्यासाठी या दौडचे आयोजन प्रमुख पाहुणे डॉ. विक्रम कवितके यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्याध्यापक श्री विश्वेश जोशी यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले.

दौड साठी डॉ. विक्रम कवितके यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून फाटक हायस्कूल-शेरे नाका -लक्ष्मी चौक आणि पुन्हा फाटक हायस्कूल अशा मार्गाने दौंड चे आयोजन करण्यात आले होते. 

दहावीतील 280 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये ईशान घडशी, सोहम कांबळे, सिद्धार्थ धुळप सर्व १०वी ड यांनी अनुक्रमे तीन क्रमांक तर विद्यार्थिनींमध्ये दहावी इ मधील सुनाक्षी मयेकर, कशिश सनगरे, तीर्था केदार यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक श्री राजन, कीर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्याध्यापक श्री विश्वेश जोशी यांच्या सहकार्याने दौडचे यशस्वी आयोजन क्रीडा शिक्षक श्री. मंदार सावंत यांनी केले. दौड साठी शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची विशेष सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow