रत्नागिरी : खरवते पंचक्रोशीत बिबट्यांचा मुक्त संचार

Jul 25, 2024 - 11:41
Jul 25, 2024 - 14:44
 0
रत्नागिरी : खरवते पंचक्रोशीत बिबट्यांचा मुक्त संचार

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे, ढोकमळे, वारे, कोतवडे, जांभरूण, खरवते या पंचक्रोशीत बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. 

काही दिवासांपूर्वी ढोकमळे परिसरात तीन बिबटे एकत्रित फिरताना दिसले होते; तर नेवरे कोतवडे रस्त्यावर दिवसाढवळ्याही बिबट्यांचा वावर वाढला आहे. या मार्गावरून प्रवास करणारे दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. येथील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्याकडून फडशा पाडला जात आहे. अनेक गुराख्यांना कोतवडे सड्यावर बिबट्याचे दर्शन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow