पुर्ये पुल वाहतुकीसाठी बंद
साखरपा : कोंडगावलगत असलेल्या पुर्ये गावात जाण्यासाठी असलेला सीमेचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेले अनेक दिवस हा पूल पाण्याखाली असल्यामुळे अपघात होऊ नये म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुर्ये गावात जाण्यासाठी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरून कोंडगाव महावितरण कार्यालयाच्या बाजूने एक पूल बांधण्यात आला आहे. हा पूल गेला महिनाभर पाण्याखाली गेला आहे. अतीवृष्टीमुळे हा पूल पाण्याखाली गेला काजळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे हा पूल सातत्याने पाण्याखाली गेला आहे. या पुलावरून सुमारे तीन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे.
महामार्गावरून पुलाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर टेप लावून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. सावधगिरीची सूचना म्हणून रस्त्याकडेला रस्ता बंदचा फलकही लावण्यात आला आहे. या पुलावरील सर्व वाहतूक मेढे येथून पर्यायी मागनि वळवण्यात आल्याची सूचना फलकावर लावण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 29/Jul/2024
What's Your Reaction?