संगमेश्वरातील कृषी कार्यालयाच्या इमारती धोकादायक अवस्थेत

Jul 29, 2024 - 14:56
Jul 29, 2024 - 14:58
 0
संगमेश्वरातील कृषी कार्यालयाच्या इमारती धोकादायक अवस्थेत

देवरुख : संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या संगमेश्वर व देवरुख मंडळ कृषी कार्यालयाच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या दोन्ही इमारती कोसळण्याच्या स्थितीतच आहेत. असे असतानाही या इमारतीमध्ये कार्यालयाचे कामकाज सुरु आहे.

संगमेश्वर, आरवली व देवरुख अशी तीन मंडळ कार्यालय तालुका कृषी कार्यालय अंतर्गत काम करत आहेत. यातील संगमेश्वर व देवरुख मंडळ कृषी कार्यालय यांच्या स्वतंत्र इमारती देवरुख शाळा क्र. ३ समोर उभ्या आहेत. या अत्यंत जुन्या इमारत्ती असून, दोन्ही इमारतींचे छप्पर पूर्णपणे गळत आहे.

सध्या या दोन्ही इमारतींना प्लास्टिकचा आधार देण्यात आला आहे. असे असतानाही या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. इमारतीच्या भिंती पूर्णपणे पाण्याने भिजून गेल्या आहेत. भिंतीला तडे देखील गेले आहेत. पावसाचे छप्परातून येणारे पाणी पूर्णपणे कार्यालयात पसरले आहे. या इमारतीपडून मोठी जीवितहानी देखील होऊ शकते. याची खबरदारी तालुका कृषी कार्यालय व संबंधित बांधकाम विभागाने घेणे आवश्यक आहे. या इमारती अत्यंत जुन्या असल्यामुळे या इमारती कालबाह्य झालेल्या आहेत.

दोन्ही कार्यालयांचे कामकाज अन्य ठिकाणी न्यावे
या दोन्ही इमारती धोकादायक स्थितीत आहेत. असे असतानाही या इमारतीमध्ये प्रत्यक्षात कामकाज सुरु आहे. या धोकादायक इमारती कधीही पडू शकतात अशा स्थितीत असल्याने या दोन्ही कार्यालयांचे कामकाज अन्य ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow