जगबुडी नदीत कंटेनर कोसळता-कोसळता वाचला

Jun 12, 2024 - 10:44
 0
जगबुडी नदीत कंटेनर कोसळता-कोसळता वाचला

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी (दि. ११) सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास भरणे पुलावर मुंबईकडून माल भरून गोव्याकडे जाणारा कंटेनर जगबुडी नदीत कोसळताना थोडक्यात बचावला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी वाहतुकीचा काहीकाळ खोळंबा झाला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी झाल्यानंतर वादात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेले पूल धोकादायक बनले असून, सातत्याने येथे अपघात होत आहेत. याच ठिकाणी गेल्या वर्षभरात अर्धा डझनपेक्षा जास्त अपघात झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई हुन गोव्याकडे जाणारा कंटेनर (एच आर ३८ ए ७६३४) वरील चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर जगबुडी पुलावर दोन पुलांच्या मधील दुभाजकावर चढला. यावेळी दुभाजकाच्या मधोमध दोन्ही पुलांच्या मधील मोकळ्या जागे पासून काही फुटावर कंटेनर थांबल्याने पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी, रुपेश पवार, प्रतीक पाटणे, विलास पाटणे यांनी घटनस्थळी जाऊन कंटेनर चालकाला मदत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow