मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला, अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

Jul 29, 2024 - 14:45
 0
मोदी सरकारने जनतेच्या पाठीत अन् छातीत सुरा खुपसला, अर्थसंकल्पातील तरतुदींवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

वी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात काँग्रेसेचे नेते तथा विरोधी पक्षनेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी काहीही नाही.

दोन ते तीन टक्के लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच सरकारने मध्यम वर्गाच्या पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.

शेतकरी, कामगारांना मदत केली जाईल असे वाटले होतो पण...

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना मदत केली जाईल, तरुणांना मदत केली जाईल. देशातील कामगार, छोट्या उद्योजकांची मदत केली जाईल. मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एकाधिकारशाहीच्या सूत्राला आणखी मजबूत करण्यात आलं. एकाधिकारशाहीमुळे लोकशाही मूल्यांना नेस्तनाबूत केलं. उद्योगातील एकाधिकारशाहीमुळे देशातील लघु, शूक्ष्म उद्योगांना फटका बसला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

एकविसाव्या शतकात देशात नव्या प्रकारचे चक्रव्यूह

सध्या देशात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. ही स्थिती सध्या सर्वदूर आहे, सध्या एकविसाव्या शतकात देशात नव्या प्रकारचे चक्रव्यूह आहे. चक्रव्यूहाला पद्मव्यूह म्हटले जाते. ज्या प्रकारे अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये फसवण्यात आलं होतं. त्याच पद्धतीने आता भारतीय जनतेतील नागरिकांना फसवण्यात आलं आहे. सध्या देशातील युवक, शेतकरी, महिला, लघु आणि शूक्ष्म उद्योग चक्रव्यूहात फसले आहेत. महाभारतातील चक्रव्यूह सहा जण कंट्रोल करत होते. आताही नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदाणी या सहा जाणांकडून चक्रव्यूहाला कंट्रोल केले जात आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow