अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर रवींद्र वायकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स

Jul 30, 2024 - 11:06
 0
अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर रवींद्र वायकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar)यांच्या लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीशी संबंधित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने काल (सोमवारी) शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना समन्स बजावले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त 48 मतांनी पराभूत झालेल्या कीर्तिकर यांनी वायकर (Ravindra Waikar) यांच्या खासदारकीला आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर अमोल कीर्तिकरांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघामधून आपल्याला विजयी घोषित करावं अशी मागणी केलेली आहे. न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने निवडणुकीतील मतमोजणीशी संबंधित याचिकेवरील सुनावणी 2 सप्टेंबरला ठेवली आहे.

संबधित प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रवींद्र वायकरांना (Ravindra Waikar)अमोल कीर्तिकर यांच्या आरोपांबाबत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar)यांनी आपल्या एजंटला निवडणूक अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ बसू दिलं नाही. कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरल्यानंतर उमेदवाराला फेरमतमोजणीचा अधिकार असतानाही तो नाकारला गेला असे आरोप केलेले आहेत.त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक हरवण्यासाठी प्रयत्न केले. निवडणूक अधिकाऱ्यांनी अनेक त्रुटी ठेवल्या असंही किर्तीकरांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

कीर्तिकरचे आरोप कोणते?

निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेत अनेक त्रुटी ठेवल्या. फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यासाठी परवानगी दिली, असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.

लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा विजय झाला. मात्र त्या दिवशी वायकर यांचा मेहुणा मतमोजणी केंद्रात ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं. मतमोजणी केंद्रावरील खोलीत परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणात उमेदवार भरत शाह यांना साक्षीदार बनवण्यात आलं आहे. तक्रारदार उमेदवार भरत शाह यांना एफआयआर कॉपी देण्यास पोलिसांचा नकार देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow