मंडणगडमधील लोकअदालतीत ५ प्रकरणे तडजोडीने निकाली

Jul 30, 2024 - 11:15
Jul 30, 2024 - 14:17
 0
मंडणगडमधील लोकअदालतीत ५ प्रकरणे तडजोडीने निकाली

मंडणगड : तालुका विधी सेवा समिती, दापोली अंतर्गत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, मंडणगड येथे आयोजित २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मंडणगड एम. ए. शिंदे यांनी पॅनल म्हणून आणि अॅड. धनंजय करमरकर यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. लोकअदालतीमध्ये वादपूर्व २८८ प्रकरणे तसेच प्रलंबित असणारे १२१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २१ प्रलंबित असणारी प्रकरणे व ५ वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या प्रकरणांमधून एकूण रक्कम २७५७२०० रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. मंडणगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अॅड. मिलिंद लोखंडे अध्यक्ष वकील संघ मंडणगड, अॅड. सचिन बेर्डे, सचिव वकील संघ मंडणगड, अॅड. धनंजय करमरकर यांचे सहकार्य लाभले. या लोकअदालतीमध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मंडणगड एम. ए. शिंदे यांनी पॅनल म्हणून आणि अॅड. धनंजय करमरकर यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow