सुशांतसिंह राजपूत-दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधातील जनहित याचिकेवर होणार सुनावणी

Jul 30, 2024 - 14:29
 0
सुशांतसिंह राजपूत-दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधातील जनहित याचिकेवर होणार सुनावणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha Salian) आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका सादर झाली होती.

या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाची सुनावणी ३१ जुलैपूर्वी करण्याचे ठरवले आहे. सीबीआय आणि राज्य पोलिसांना दिलेल्या तारखेपूर्वी तपास अहवाल सादर करावा लागेल आणि दोन्ही प्रकरणांमध्ये तपासाची माहिती उच्च न्यायालयाला द्यावी लागेल. सप्टेंबर 2023 रोजी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तपासाला गती देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. फडणवीस यांनी स्थापन केलेल्या एसआयटी पथकात पोलिस आयुक्त राजीव जैन, डीसीपी अजय बन्सल आणि वरिष्ठ पी.आय. चिमाजी आढाव यांचा समावेश होता. पी.आय. चिमाजी आढाव यांच्यावर आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow