खेड : ज्ञानदीप महाविद्यालयामध्ये करिअर संसदेची स्थापना
खेड : जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून ज्ञानदीप महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागातर्फे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी 'करिअर संसद' स्थापन करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमधून विविध पदांसाठी प्रतिनिधींची निवड करून त्यांना पद व त्यांची जबाबदारी यांची शपथ देण्यात आली. यामध्ये सर्व पदाधिकारी व सदस्य यांना करिअर संसदेचे महत्त्व सांगून त्यांची असलेली जबाबदारी याबद्दल माहिती दिली तसेच करिअर कट्टा अंतर्गत येणाऱ्या विविध स्पर्धा, आवश्यक कौशल्ये यांच्याबाबत इतर विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सीतारामपंत जामकर उपस्थित होते. त्यांचा सत्कार प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 31/Jul/2024
What's Your Reaction?