नोकरीचे आमिष दाखवून मोटर सायकल चोरून पळून गेलेल्या चोरट्यास अटक

Jul 31, 2024 - 12:03
Jul 31, 2024 - 12:39
 0
नोकरीचे आमिष दाखवून मोटर सायकल चोरून पळून गेलेल्या चोरट्यास अटक


रत्नागिरी : कणकवली मधून मोटर सायकल चोरून पळून गेलेल्या चोरट्यास सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्या मोटर सायकलसह ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील जीवन गणपत जाधव असे त्या चोरट्याचे नाव आहे.

अनिकेत संदिप नागवेकर, (22 ) याचेशी ओळख वाढवून आपण कोर्टात कामाला आहे. तुला कणकवली येथे नोकरीला लावतो असे सांगितले, नोकरीबाबत दिलेल्या आवश्वासनामुळे अनिकेत नागवेर याने त्यांचेच वाडीतील सायली सतिश चाळके यांचे मालकीची होंडा यूनिकॉर्न ( क्र. MH-08-AV-7774 ) घेवून जाधव नावाचा इसम आणि अनिकेत नागवेकर असे दोघेही मोटार सायकलने 29 जून 2024 रोजी दुपारनंतर संगमेश्वर वरुन कणकवलीला पेणेसाठी निघाले. कणकवली येथे येणेसाठी रात्र होणार असल्याने राजापूर येथे लॉजवर मुक्काम केला. तेथून 30 जून2024 रोजी दोघेही मोटार सायकलने कणकवली,ओरोस असा प्रवास करीत कुडाळ येथे आले. जाधव नामक व्यक्तीने अनिकेत नागवेकर याला नौकरीला लावण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्गात इकडे-तिकडे फिरवीले. मुदतीत 30 जून 2024 ते 02 जुलै 2024पर्यंत कुडाळ येथे लॉजवर थांबले. त्यानंतर 2 जुलै 2024 रोजी जाधव याने अनिकेत यास तू रेल्वेने संगमेश्वरला जा असे सांगून कुडाळ रेल्वेस्टेशन येथे रेल्वेचे तिकीट काढून दिले. परंतू अनिकेत नागवेकर याने रेल्वेने जाणेस नकार दिला. त्यानंतर ते मोटार सायकलने संगमेश्वरला जाणेसाठी निघाले असता फोंडा येथे एका निर्जन ठिकाणी लघवीचे बहाण्याने मोटार सायकल थांबवून अनिकेत हा लघविसाठी खाली उतरला असता जाधव हा मोटार सायकल लबाडीच्या इराद्याने चोरुन घेवून पळून गेला. त्यानंतर अनिकेत नागवेकर हा एस.टी. बसने संगमेश्वर येथे गेला व त्याने संगमेश्वर पोलीसठाणे येथे सदरबाबत तक्रार दिली. संगमेश्वर पोलीस ठाणेने सदरची तक्रार घेवून कणकवली पोलिसांकडे वर्ग केली . त्यावरून रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी केली असता जीवन गणपत जाधव, रा. पावस, जि. रत्नागिरी याचेवर सिंधुदुर्गनगरी व सावंतवाडी पोलीस ठाणेमध्ये यापुर्वी 2006 व 2016 मध्ये गुन्हे दाखल असून त्याने सदरचा गुन्हा केला असावा असे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानंतर महामार्गावरील तसेच ज्या लॉजला संशयित व फिर्यादीने वास्तव्य केले होते त्याठिकाणचे CCTV फुटेज चेक केले असता आरोपी व फिर्यादी हे सदर मोटार सायकलने प्रवास करत असतानाचे फुटेज प्राप्त झाले. जीवन जाधव याचेवर यापुर्वी जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील रेकॉर्डवर असलेले जुने फोटो प्राप्त करुन घेतले. CCTV फुटेज व गुन्ह्यातील प्राप्त केलेले फोटो यांचे सुक्ष्म निरीक्षक करता त्यामध्ये साम्य दिसून आले व तोच महत्त्वाचा धागा पकडून मानवी कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणावरुन अविरत तपास करुन, आरोपीचा रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली येथे शोध तपास सुरू केला. 30 जुलै 2024 रोजी सांगली येथे आरोपीचा शोध घेत असताना शिराळा, बायपास रोड येथे आरोपी असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने तसेच मध्यरात्रीची वेळ असूनही विशेष पथकाने नियोजनबध्द सापळा रचून संशयितास गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. संशयित व मोटार सायकल पुढील कायदेशीर कारवाईकरीता कणकवली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले असून पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत. संशयिताने अशाप्रकारे अजून कोठे गुन्हे केलेत आहेत का? याबाबत तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow