खेड : स्मशानभूमीतून २० हजारांच्या लाकडांची चोरी

Aug 3, 2024 - 10:43
 0
खेड : स्मशानभूमीतून २० हजारांच्या लाकडांची चोरी

खेड : येथील नगर परिषदेच्या वैकुंठ स्मशानभूमीतून अंत्यविधीसाठी ठेवलेली सुमारे वीस हजार रुपये किमतीची लाकडे दि. २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ०७.०० वा पूर्वी अज्ञाताने चोरली आहेत.

याप्रकरणी दि.०१ रोजी सायंकाळी ४.४७ वा. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी संजय मधुकर खैरे (वय ४८, रा. चाकाळे बौद्धवाडी, ता. खेड, जि रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार खेड नगर परिषद वैकुंठ स्मशानभूमीतील गोडावूनमध्ये अंत्यविधीकरिता ठेवलेली लाकडे अज्ञात इसमाने स्मशानभूमीतील शटरचे लॉक तोडून चोरून नेलेली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow