चिपळूण : कुटरेत चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक

Jul 25, 2024 - 10:49
Jul 25, 2024 - 16:52
 0
चिपळूण : कुटरेत चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक

चिपळूण : तालुक्यातील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषिविश्व कृषिदूत संघाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुटरे येथे संजय राजेशिर्के यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रात्यक्षिकाची सुरुवात खताचे झाड, गिरीपुष्पाचा पाला शेतात टाकून करण्यात आली. मातीत नत्राचे प्रमाण युरिया न टाकता वाढवण्यासाठी खताच्या पाल्याचा वापर करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. दोरीच्या सहाय्याने रोपांची पुनर्लागवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकासाठी आसपासचे शेतकरी आणि कृषिदूत ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, संग्राम पाटील, सुमित सावंत, अनिकेत मस्के, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके यांनी परिश्रम घेतले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:17 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow