जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त!

Jun 1, 2024 - 10:37
 0
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त!

मुंबई : आजपासून जून महिना चालू झाला आहे. या महिन्यात पहिल्या दिवसापासूनच अनेक नियम बदलणार आहेत. यात वाहतुकीच्या नियमांचाही समावेश आहे. आज लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) शेटवच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.

या मतदानानंत एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले जातील. हे अंदाज व्यक्त केले जाण्याच्या अवघ्या काही तास अगोदर नागरिकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. एक जूनपासून गॅस सिलिंडरच्या दरात (Gas Cylinder Rate) कपात करण्यात आली आहे.

सलग तीन महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात घट

देशातील ऑईल कंपन्यांनी सलग तिसऱ्यांना व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत चार महानगरातील व्यावसायिक गॅस सिलिंडर 119 ते 124 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 70 ते 72 रुपयांनी घट झालेली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर किती रुपयांनी स्वस्त?

आयओसीएलच्या माहितीनुसार देशातील चार महानगरांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 69.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यामुळे आता दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलिंडरचा दर क्रमश: 1676 रुपये आणि 1629 रुपयांपर्यंत खाली आला आहे. कोलकाता शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडर 72 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे कोलकात्या सिलिंडरचा दर 1787 रुपये झाला आहे. चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 70.5 रुपयांनी घट झाली असून सिलिंडरची किंमत 1840.50 रुपयांनी कमी झाली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली का?

गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट होत आहे. मात्र या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र घट झालेली नाही. 9 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचा दर जैसे थे आहे. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 9 मार्च रोजी शेवटची 90 रुपयांची घट झाली होती. या निर्णयामुळे दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 803 रुपयांची घट झाली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मार्चमध्ये 90 रुपयांची घट झाल्यानंतर मुंबईत या सिलिंडरचा दर 829 रुपये तर चेन्नईत 818.50 रुपयांपर्यंत कमी झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 01-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow