संगमेश्वर : देवरुखमध्ये राज्यातील पहिले तायक्वाँदो सभागृह

Aug 1, 2024 - 10:29
 0
संगमेश्वर :  देवरुखमध्ये राज्यातील पहिले तायक्वाँदो सभागृह

देवरुख : महाराष्ट्र राज्यातील पहिले तायक्वांदोचे सभागृह आपल्या मतदारसंघातील देवरुख येथे उभे राहिल्याचा आनंद फार मोठा आहे. तायक्वांदो खेळाच्या पाठीशी आपण सदैव उभे राहणार असल्याचे अभिवचन चिपळूण संगमेश्वर आमदार शेखर निकम यांनी सभागृहाचे उ‌द्घाटनाप्रसंगी दिले.

संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व देवरुख नगर पंचायत तायक्वांदो क्लब यांच्या पुढाकाराने व आ. शेखर निकम यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या तायक्वोंदी सभागृहाचे उ‌द्घाटन आमदार निकम यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

यावेळी आमदार निकम यांनी या सभागृहाचा वापर केवळ तायक्वांदो खेळासाठीच व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. याचप्रमाणे या सभागृहासाठी आवश्यक असणारा आणखी वाढीव निधी मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे यावेळी बोलताना सांगितले. याचबरोबर राजकारणातील उलथापालथीमध्ये आपल्याला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही तरीही तायक्वांदो खेळाच्या पाठीशी आपण व आपली सह्याद्री शिक्षण संस्था उभी राहील, असे नमूद केले.

तायक्वांदो खेळाडूंमध्ये असलेली चिकाटी यामुळेच राष्ट्रीय स्तरापर्यंत येथील खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत, या खेळाडूंचे कौतुक त्यांनी केले. तसेच विशाखापटणम येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या श्रुती नारकर हिला यशस्वी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या. या प्रसंगीत तायक्वांदो अॅकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष बने यांनी खेळाडूंची धडपड पाहून आपण या खेळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आणि आज हा सखेळ नावारूपाला आला असून पूर्ण राज्यामध्ये आदराने संगमेश्वर तालुक्याचे व खेळाडूंचे नाव आदराने घेतले जाते यामुळे आपण केलेली मदतदसार्थकी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे असाच मदतीचा हात देत राहू, असे सांगितले.

यावेळी क्लब अध्यक्ष स्मिता लाड यांनी तालुक्यात खेळ सुरू झाल्यापासून ते आजपर्यंतचा प्रवासाचा आढावा घेतला हे काम करत असताना समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी देखील मनोगतातून खेळाडूंना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमामध्ये २० वर्षांच्या तायक्वांदो प्रवासातील सर्व खेळाडू, सहकार्य करणारे दाते, लोकप्रतिनिधी, नगरपंचायतीचे नगरसेवक व अधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चौगले, सहायक गटविकास अधिकारी अंकिता लाड, कृषी अधिकारी विनोदकुमार शिंदे, माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, पूनम चव्हाण, संदेश जागुष्टे, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांसह खेळाडू, पालक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमात खेळाडूंनी विविध प्रात्यक्षिक दाखवले. प्रात्यक्षिकांनी उपस्थित खेळाडू प्रेमी भारावून गेले. आभार मानताना नगर पंचायत मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी हा सभागृह केवळ तायक्वाँदो खेळासाठीच वापरला जाईल, असे अभिवचन देऊन उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन संतोष लाड व अण्णा बेर्डे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow