रत्नागिरी जिल्ह्यात दोन महिन्यांत ७५ टक्के पाऊस

Aug 1, 2024 - 16:02
 0
रत्नागिरी जिल्ह्यात दोन महिन्यांत ७५ टक्के पाऊस

रत्नागिरी : जून महिन्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये जोरदार आगेकूच अडीच हजार मि.मी.च्या सरासरीने आतापर्यंत ७५ टक्के पाऊस झाला आहे. पावसाचा जोर ओसरलेला असला, तरी आजपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागात पुन्हा जोरदार पाऊस सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अरबी सागरातील कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय वाऱ्याच्या प्रभावाने पाऊस पुन्हा सक्रिय होण्यास अनुकूल ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कोकणातील जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५४.२८ मि. मी. च्या सरासरीने एकूण ४८८.५० मि.मी. पाऊस झाला, यामध्ये मंडणगड तालुक्यात ८६.८०, दापोली ३९.८०, खेड५६.७०, गुहागर ३८.४०, चिपळूण ५२.३०, संगमेश्वर ७७. २०, रत्नागिरी ५२.६०, लांजा ५१.३० आणि राजापूर तालुक्यात ३३.४० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जूनपासून ३१ ऑगस्टपर्यंत २५४७ मि.मी. च्या सरासरीने एकूण २३ हजार मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या हंगमात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे. गतवर्षी या कालावधित पावसाने ६३ टक्के सरासरी मजल मारली होती. टक्केवारीच्या तुलनेत या वर्षी रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यात ९० टक्क्के पाऊस झाला आहे. दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या सहा तालुक्यांमध्ये पावसाने सत्तरी गाठली आहे तर मंडणगड तालुक्यात पाऊस पासष्टीत पोहचला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद खेड तालुक्यात झाली आहे.

 पावसाचा अलर्ट
जोरदार पावसाचा अंरिंज अलर्ट - ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट- बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow