चिपळूणमध्ये 'ग्रॅव्हिटी' योजनेला मान्यता; आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा

Aug 19, 2024 - 11:12
Aug 19, 2024 - 14:35
 0
चिपळूणमध्ये  'ग्रॅव्हिटी' योजनेला मान्यता; आमदार शेखर निकम यांचा  पाठपुरावा

चिपळूण : राज्य सरकारने नगरोत्थान महाअभियानांतर्गत चिपळूण पालिकेच्या १५५ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या 'ग्रॅव्हिटी'  पाणी योजनेस मान्यता दिली. मंजुरीचा शासन निर्णय शुक्रवारी शासनाकडून जारी करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून चिपळूणवासीयांनी पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. या योजनेतील सर्व अडथळे दूर झाले असून, येत्या १५ दिवसांत योजनेची निविदा प्रसिद्ध होऊन लवकरच भूमिपूजन होऊन कामालाही सुरुवात होणार आहे.

कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीची नळपाणी योजना चिपळूण शहरासाठी होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेकांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यातून २०१७ मध्ये पुणे येथील एका कंपनीमार्फत सर्वेक्षणदेखील केले होते. यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या. अखेर आमदार निकम यांनी सुरुवातीपासून या विषयात लक्षघालत पाठपुरावा सुरू ठेवला. यातून पावसाळी अधिवेशनादरम्यान सुमारे १६० कोटी रुपयांच्या या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवून घेण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत १५५ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली. शुक्रवारी या योजनांचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याने ग्रॅव्हिटीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया करून भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार आहे. या योजनेवरून उठलेल्या वावड्यांना आमदार शेखर निकम यांनी पाठपुराव्यातून चोख प्रत्युत्तर दिले. योजनेचा मार्ग पूर्णतः सुकर झाल्याबद्दल शहरवासीयांकडून आमदार शेखर निकम यांचे अभिनंदन केले जात आहे.

गेल्या पाच वर्षात सुरुवातीला कोरोना महामारीनंतर महापूर अशा अनेक नैसर्गिक आपतीला सामोरे जावे लागले. याही स्थितीत चिपळूण मतदारसंघात तब्बल १३०० कोटीहून अधिकचा निधी आणला. त्यातून मत्त्वाची विकासकामे मार्गी लागल्याने हा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर आला आहे.

चिपळूणची ग्रॅव्हिटी योजना म मार्गी लावणे हे एक माझ्यासाठी चॅलेंज होतं. ते महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले. आजपर्यंत केलेल्या विकासकामांमधील हे सर्वांत महत्वाचे आणि मोठं काम आहे. चिपळूणवासीयांनी पाहिलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं, याचा नागरिकांप्रमाणे मलाही आनंद आहे. शेखर निकम, आमदार चिपळूण विधानसभा

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow