लांजा वन विभागाने उभारला औषधी वनस्पती व फळझाडे रोपांचा विक्री स्टॉल

Aug 12, 2024 - 10:32
Aug 12, 2024 - 13:34
 0
लांजा वन विभागाने उभारला  औषधी वनस्पती व फळझाडे  रोपांचा विक्री स्टॉल

लांजा : लांजा वन विभागाच्या वतीने सवलतीच्या दरातील औषधी वनस्पती आणि फळझाडे रोपांचा विक्री स्टॉल लांजा शहरात लावण्यात आला आहे. अमृत वृक्ष आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वन विभागाने वड, फणस, चिंच, बेल, पेरू, रक्तचंदन, निव, अशा विविध औषधी तसेच उपयोगी झाडांची रोपे सवलतीच्या दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. वन महोत्सव कालावधीत वनविभागाने वृक्ष लागवडीबाबत जनजागृती आणि प्रचार केला आहे. लांजा वनविभागअंतर्गत येथे वन विभागाचे नर्सरी आहे. या नर्सरीमध्येही विविध प्रकारची उपयुक्त झाडे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लांजा शहरात सहजरीत्या झाडे उपलब्ध व्हावी यासाठी लांजा वनविभाग कार्यालयाच्या शेजारी विविध झाडांची रोपे विक्री स्टॉल सुरू करण्यात आला आहे. यावेळी वनपाल दिलीप आरेकर वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, कर्मचारी मंगेश आंबेकर, अमित लांजेकर सत्यवान गुरव तनुजा साळुंखे आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow