जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त रत्नागिरीत जनजागृती

Aug 2, 2024 - 10:29
Aug 2, 2024 - 13:53
 0
जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त रत्नागिरीत जनजागृती

रत्नागिरी : 'हेपॅटायटीस' हा संसर्ग पसणारा आजार आहे. यामुळे यकृत सुजण्याची शक्यता असते. हेपॅटायटीस बी व सी तीव्र होऊन त्याचे रूपांतर लिव्हर सिरॉसिस, कॅन्सरमध्ये होऊन मृत्यूदेखील ओढवू शकतो; परंतु हेपॅटायटीस आजार टाळता येऊ शकतो, असा फलक घेऊन जागतिक हेपॅटायटीस दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय व्हायरल हेपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत रॅली काढण्यात आली. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. संजय नीलेश माईनकर, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयांतर्गत काविळीची  मोफत तपासणी व उपचार हेपॅटायटीस बी पॉझिटिव्ह मातेच्या बाळाला जन्मानंतर २४ तासांच्या आत इन्जेक्शन एचबीआयजी देऊन आपण संभाव्य धोका टाळू शकतो. धूम्रपान टाळा, कर्करोगास पळवा असे फलक हाती घेऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी फेरीत सहभागी झाले होते, जयस्तंभ मार्गे मध्यवर्ती बसस्थानकाजवळ फेरी आल्यानंतर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात फेरीची सांगता झाली. रा. भा. शिर्के प्रशालाचे विद्यार्थी, भारत स्काऊटचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी फेरीत सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow