शिरगाव येथील बेपत्ता वृद्धेचा मृतदेह खाडी किनारी आढळला

Aug 2, 2024 - 10:26
 0
शिरगाव येथील बेपत्ता वृद्धेचा मृतदेह खाडी किनारी आढळला

रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव येथील खाडीत बेपत्ता वृध्देचा मृतदेह आढळला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी पर्शुराम गोताड (६०, रा. घडशीवाडी शिरगाव, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. 

पल्लवी गोताड या बुधवार ३१ जुलै रोजी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात खबर देऊन त्यांचा आजुबाजुला शोध घेतला जात होता. दरम्यान, रात्री ११ वा. शिरगाव शेट्येवाडी येथील खाडी किनारी त्या बेशुध्द अवस्थेत मिळून आल्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow