२६ जूनला मतदानास कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी द्यावी ; मनसेची मागणी

May 30, 2024 - 10:18
 0
२६ जूनला मतदानास कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी द्यावी ; मनसेची मागणी

खेड : येत्या २६ जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघातील शासकीय, निमशासकीय तसेच अन्य आस्थापनातील कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी त्या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार अभिजित पानसे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी भेट घेऊन सुट्टी देण्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर उपस्थित होते. पदवीधर उमेदवार अभिजित पानसे यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांसोबत आमची खूपच चांगली चर्चा झाल्याची माहिती खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बोलताना दिली.
कोकणात सध्या बदलाचे वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला बदल अपेक्षित आहे. त्या दृष्टीने प्रचाराची रणनीती आखण्यात येत असल्याचे श्री. खेडेकर यांनी सांगितले. मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघात प्रचारात उडी घेतल्याने मतदारसंघात चांगलीच रणधुमाळी उडणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 30/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow