रत्नागिरीत उद्या भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन

Aug 2, 2024 - 14:49
Aug 2, 2024 - 15:02
 0
रत्नागिरीत उद्या भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन

राजापूर : आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी या अनुषंगाने भाजपचे शनिवारी (ता. ३) रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय आणि मंगळवारी (ता. ६) तळवडे येथे राजापूर पूर्व मंडल तालुकास्तरीय एकदिवसीय अधिवेशन होणार आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी आणि आढावा घेण्यासाठी भाजपच्या राजापूर तालुका पूर्वमंडलची तालुकाध्यक्ष भास्कर सुतार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजापूर- लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

अधिवेशनाला खासदार नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने राजापूर तालुका पूर्वमंडलच्या सभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली राजापूर विधानसभा प्रमुख गुरव यांच्यासह जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, ज्येष्ठ भाजप नेते राजन देसाई आदींनी अधिवेशनासह संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow