गुहागर : शृंगारतळी ग्रा. पं.ची आठवडा बाजारात कारवाई

Aug 12, 2024 - 10:50
Aug 12, 2024 - 13:56
 0
गुहागर :  शृंगारतळी ग्रा. पं.ची आठवडा बाजारात कारवाई

गुहागर : तालुक्याची मोठी बाजारपेठ असणाऱ्या शृंगारतळी येथे दर शनिवारी आठवडा बाजार भरविला जातो. या बाजारात अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. बाजारात सामान विक्रीकरिता येणारे व्यापारी त्यांचे दुकान लावण्याकरिता रस्त्यालगत असणाऱ्या पेव्हर ब्लॉक वर सळई ठोकून मोठे दगड बांधून त्यावर प्लास्टिक टाकतात. या प्रकारामुळे रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक तुटले आहेत. काही दुकानदार आपली दुकाने रस्त्याच्या अगदी जवळ लावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.

याची दखल घेत ग्रा. पं. कडून प्लास्टिक पिशव्या तसेच रस्त्यावर मारण्यात येणाऱ्या सळई जप्त करण्यात आल्या. अतिक्रमण केलेली दुकाने मागे घेण्यात आली. यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, ग्रामविकास अधिकारी वडद, सदस्य, कर्मचारी, आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow