Paris Olympics 2024, Controversy : महिला बॉक्सर विरूद्ध पुरुष खेळला? वादावर समितीने दिलं स्पष्टीकरण

Aug 2, 2024 - 14:50
 0
Paris Olympics 2024, Controversy : महिला बॉक्सर विरूद्ध पुरुष खेळला? वादावर समितीने दिलं स्पष्टीकरण

पॅरिस ऑलिम्पिक २०२४मधीलबॉक्सिंगचा एक सामना वादात सापडला. महिलांच्या वेल्टरवेट गटाच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियन बॉक्सर इमान खेलिफ यांच्यात बॉक्सिंगचा सामना रंगला.

त्यावेळी हा वाद निर्माण झाला. अँजेला कारिनीने सामना अर्धवट सोडला आणि इमान खेलिफने ४६ सेकंदात विजय मिळवला. यानंतर महिलांच्या बॉक्सिंगमध्ये पुरुष बॉक्सरला परवानगी दिल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत आहे. आता या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून स्पष्टीकरण आले आहे.

महिला बॉक्सरचा पुरुषाशी सामना?

अल्जेरियन बॉक्सर इमेन खेलिफ यापूर्वीही लिंग पात्रता टेस्ट संदर्भात वादात सापडली आहे. २०२३ बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सुवर्णपदक सामन्याच्या काही तास आधी इमान खेलिफ हिला जेंडर एलिजिबिलीटी टेस्टच्या आधारावर अपात्र ठरवण्यात आले. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अर्थात IOC ने त्याला अलीकडेच २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची तिला परवानगी दिली. तिच्या पहिल्याच फेरीच्या सामन्यानंतर हा वाद पुन्हा निर्माण झाला असून इमेन खलिफने महिला गटात खेळणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

IOC चे स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक निवेदन जारी केले आहे की, पॅरिस २०२४ ऑलिम्पिक खेळांच्या बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू स्पर्धेच्या पात्रता आणि प्रवेश नियमांचे तसेच पॅरिस 2024 बॉक्सिंग युनिट (PBU) द्वारे सेट केलेल्या सर्व लागू नियमांचे पालन करुनच सहभागी होत आहेत. वैद्यकीय नियमांचे पालन केले जात आहे. मागील ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धांप्रमाणे खेळाडूंचे लिंग आणि वय त्यांच्या पासपोर्टवर आधारित असणार आहे. PBU ने टोक्यो 2020 बॉक्सिंग नियमांचा पॅरिस 2024 साठी नियम तयार करण्यासाठी बेसलाइन म्हणून वापर केला आहे. त्याचा उद्देश खेळाडूंच्या तयारीवर होणारा परिणाम कमी करणे आणि ऑलिम्पिक खेळांमधील सातत्य राखणे हा आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, पॅरिस 2024 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये दोन महिला खेळाडूंनी भाग घेतल्याबद्दल काही अहवालांमध्ये आम्ही दिशाभूल करणारी माहिती पाहिली आहे. ऑलिम्पिक गेम्स टोक्यो 2020, इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि IBA मंजूर टूर्नामेंटसह दोन्ही खेळाडू अनेक वर्षांपासून महिलांच्या गटात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये खेळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow