कारवांचीवाडी येथून दुचाकी चोरीला

Aug 3, 2024 - 10:04
 0
कारवांचीवाडी येथून दुचाकी चोरीला

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील शेडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना शनिवार २४ जुलै रोजी रात्री ९.१० ते २५ जुलै रोजी सकाळी ९ वा. कालावधीत घडली आहे. 

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विरेंद्र गोविंद गोताड (३५, रा. कारवांचीवाडी फाट्याजवळ, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार २४ जुलै रोजी रात्री आपल्या मालकीची दुचाकी (एमएच-०८-एएन- ७७८७) ही घराच्या शेडमध्ये पार्क करुन ठेवली चोरीस गेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow