राजापुरात मोटरसायकल एसटी अपघातात तरूण गंभीर

Aug 3, 2024 - 10:07
Aug 3, 2024 - 10:15
 0
राजापुरात मोटरसायकल एसटी अपघातात तरूण गंभीर

राजापूर : तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रेल्वेस्टेशन समोरील उतारावर झालेल्या मोटर सायकल व एसटी अपघातात येथील तरूण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले आहे. मात्र, एसटी चालकांच्या प्रसगांवधामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, राजापूर आगारातून सकाळी ८.३० वा. राजापूर व्हाया रेल्वेस्टेशन फुपरे ही फेरी चालू आहे.

चालक प्रकाश बुइके हे एसटी फेरी घेऊन शुक्रवारी सकाळी रेल्वेस्टेशनला जात होते. दरम्यान, सोल्ये येथील तरुण गिरीश सौदळकर हा मोटर सायकल घेऊन ससाळे येथील दवाखानामध्ये जात होता. सोल्ये येथील उतारावर एसटी आली, ती पाहून मोटारसायकल चालक सौदळकर यांचा गाडीवरील ताबा सुटला. सुमारे १० फूट मोटारसायकलवरून फरफटत जात श्री सौदळकर एसटीवर जाऊन आदळला. एसटी बालक श्री बुईकिच्या हे लक्षात येताच आपल्या ताब्यातील एसटीचा वेग कमी करीत बस गटामध्ये उतरविली. दरम्यान श्री. सौदळकर हा एसटीवर आदळून एसटीच्या खाली गेला, त्याच दरम्यान चालकाने त्वरित एसटीचा वेग आवरून गटारात उतरविली असल्याने श्री. सौदळकर मागील चाकाखाली जाता जाता वाचता अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

अपघातात सौंदळकरच्या डोक्याता गंभीर दुखापत झाली. अपघाताचे वृत्त समजात येथील रिक्षा व्यवसायिक व ग्रामस्थांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश सौंदळकर व त्यांच्या सहकाऱ्यानी गंभीर जखमी झालेल्या श्री. सौदळकर याला त्वरित उपचारासाठी रत्नागिरीला हलविले. एसटी चालकांच्या प्रसगांवधनामुळे मोठा अनर्थ टळला असल्याने परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow