रत्नागिरी : जर्मनीत दहा हजार कुशल कारागिरांना रोजगार संधी : प्राचार्य सुशील शिवलकर

Aug 20, 2024 - 11:28
Aug 20, 2024 - 14:44
 0
रत्नागिरी : जर्मनीत दहा हजार कुशल कारागिरांना रोजगार संधी : प्राचार्य सुशील शिवलकर

रत्नागिरी : शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार करण्यात आला असून, ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणार आहेत. या करारानुसार राज्यातील युवकांना युरोपियन देशात नोकरी व रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. जर्मन भाषा शिकवण्यासाठी राज्यस्तरावर शासनामार्फत २५ विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण वर्ग करण्यात येणार आहे. राज्यातील १० हजार प्रशिक्षित विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी सांगितले.

जिल्हा शिक्षण व आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. या वेळी प्राचार्य व समन्वयक शिवलकर यांच्यासह व्याख्याता राहूल बर्वे, अधिव्याख्याता राजेंद्र लठे, नम्रता शेजाळ आदी उपस्थित होते. राज्यशासन आणि जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याचा सामंजस्य करार २५ फेब्रुवारीला झाला. त्यानंतर ११ जुलैला शासननिर्णय
झाला. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकवण्यासाठी ग्योये इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्यात ९ ऑगस्टला सामंजस्य करार झाला. राज्यातील १० हजार विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. रत्नागिरीत जर्मन वर्गासाठी एमआयडीसी येथील नवनिर्माण महाविद्यालय व यश फाउंडेशन येथे चार वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेकडे सध्या जर्मन शिकवण्यासाठी दोनच शिक्षक उपलब्ध आहेत. या प्रकल्पासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सनियंत्रणासाठी व संचालनासाठी समिती गठित केली आहे.

परिचारिका, वैद्यकीय, प्रयोगशाळा, दंतचिकित्सा साहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींचा काळजीवाहक, स्वागतकक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखाधिकारी, स्वच्छक, गोदाम व्यवस्थापक, वीजतंत्री, औष्णिक वीजतंत्री, रंगारी, सुतार, गावडीकाम, नळजोडणी, हलक्या व जड वाहनांचा तंत्रज्ञ, वाहनचालक- बस, रेल्वे. ट्रक, हलकी, व जड वाइन, सुरक्षारक्षक, टपालसेवा आदी क्षेत्रातील कुशल कारागिरांना संधी आहे; मात्र त्यांच्यासाठी जर्मन भाषा येणे आवश्यक असून जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणारी ग्योथे ही प्रशिक्षण संस्था आहे.

नाव नोंदणीसाठी लिंक
शिक्षकांची संख्या पुरेशी नसल्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षणवर्ग शासनामार्फत मोफत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी लिंक तयार केली आहे. नावनोंदणीसाठी https//maa.in/Germany Employment या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य शिवलकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow