अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीचे दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

Aug 3, 2024 - 15:58
Aug 3, 2024 - 16:00
 0
अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीचे दर वाढण्याचं नेमकं कारण काय?

सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्यानं वाढ होत आहे. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्यत होत नसल्याचे दिसत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर केल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं होतं.

मात्र, आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी येत आहे. भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमती वाढण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडं देशांतर्गत किमतींना सरकारकडून पाठिंबा मिळत असल्याचंही बोललं जातंय.

MCX वर नवीन सोन्याचे दर काय?

MCX वर म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबर 2024 च्या समाप्तीसह फ्युचर्स डीलची किंमत 69,792 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. व्यवहारादरम्यान सोन्याने एकदा 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली होती. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारावर नजर टाकली तर, शुक्रवारी कोमेक्सवर 2,500 डॉलरच्या पातळीला सोन्याने स्पर्श केला होता. त्यानंत शेवटी सोने 2,486 डॉलर प्रति ट्रॉय औंसवर बंद झाले होते. दरम्यान, सोन्याच्या किमती वाढण्यास भौगोलिक राजकीय तणाव सर्वाधिक जबाबदार मानला जात आहे.

अर्थसंकल्पानंतर सोने खूप स्वस्त

गेल्या महिन्याच्या अर्थसंकल्पात सोने आणि इतर मौल्यवान धातू स्वस्त झाले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात झपाट्याने घट झाली असून, कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम जवळपास 5 हजार रुपयांनी घसरून 68 हजार रुपयांच्या खाली आले होते. आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.

सोन्या-चांदीवर GST वाढवण्याची तयारी

जागतिक कारणांशिवाय आता देशांतर्गत कारणांमुळेही सोन्याच्या किमती वाढू शकतात. लोकांना भीती आहे की कस्टम ड्युटी हटवल्यानंतर सरकार सोन्यावरील जीएसटी वाढवू शकते. सध्या सोन्या-चांदीवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. सरकार ते 5 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. सोन्यावरील जीएसटी वाढवल्यास लोकांना सोनं आणखी महाग मिळू शकते.

अर्थसंकल्पाने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठा बदल घडवून आणला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्वेलर्सच्या जुन्या मागणीनंतर सोने आणि इतर काही मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव दिला. या निर्णयाचा जनतेवर दुहेरी परिणाम होत आहे. एकीकडे असे लोक आहेत जे सोने खरेदीच्या तयारीत होते, त्यांना मोठा फायदा झाला आहे. मात्र, दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली होती, त्यांचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow