रत्नागिरीच्या विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार करणार : खा. नारायण राणे

Aug 5, 2024 - 09:42
Aug 5, 2024 - 10:55
 0
रत्नागिरीच्या विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार करणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : मतदारसंघात आपल्याला जाती-पातीचे राजकारण करायचे नसून, या भागाचा विकास करायचा आहे. रत्नागिरीच्या विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार करणार असून, पाच वर्षांनंतरची रत्नागिरी निश्चितच वेगळी असेल, मी आणि रवींद्र चव्हाण या जिल्ह्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे काम करू आणि दाखवून देऊ, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी केले.

भाजपाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

यावेळी खा. नारायण राणे म्हणाले की, इतरांपेक्षा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता वेगळा हवा. हेच वेगळेपण भाजपाची विचारधारा आहे. ते आत्मसात करा. समाजसेवक म्हणून काम करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून आपले वरिष्ठ नेते प्रत्येक क्षण या देशासाठी आणि पक्षासाठी देतात, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षनिष्ठा ठेऊन रत्नागिरी पक्ष भक्कम करा आणि आपला हक्क ठणकावून मागा, अशा शब्दात रत्नागिरीतील भाजपा कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. रत्नागिरीत चिपळूण संगमेश्वर, रामागिरी आणि लांजा राजापूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासाठी जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती, आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना आपलं सरकार पुन्हा यावे, यासाठी ही बैठक महत्वाची आहे.

स्थानिक कार्यकत्यांनी आगामी निवडनुकीसाठी सज्ज व्हाले, यासाठी ही बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर नेले आहे. महिला, कृषी, बेरोजगार, गरीब अशा समाजातील प्रत्येक घटकांसाठी त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी करताना त्यांनी कुठलीही जात, पात, धर्म पाहिला नाही. लोकसभा निवडणुकीत ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो आहोत, असे खा. राणे म्हणाले.

खा. राणे म्हणाले की, पक्षाला मजबूत करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतारा, आपल्या नेत्याबद्दल कोणी काहीही विरोधात बोलले ता निषेध करण्यासाठी तत्काळ रस्त्यावर उतरा गेले काही दिवस उद्धव ठाकरे, जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत अशावेळी पक्ष म्हणून आपल्या नेत्याच्या पाठही भक्कम उभे राहा. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या बूटमध्ये आपण मागे आहोत त्या बुथमधील विरोधातील प्रत्येक लोकांना भेटा. उद्धव ठाकरे के स्वार्थी आहेत ते तुमचं भलं करणार नाही. फक्त स्वताच्या फायद्यासाठी जातीपातीचे धर्माचे राजकारण ते करत आहेत तर पंतप्रधान मोदी मात्र देशातील जनतेच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहेत हे या लोकांपर्यंत पोहोचवा कोकणातील वातावरण हे सखोलाचे वातावरण होते. सगळेचजण एकमेकांचे सण उत्सव एकोप्याने सारे करत होते मात्र, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी जाती धर्मात निर्माण केलेली तेढ दूर करून रानागिरीचा विकास करण्यासाठी काम करूया, असे आवाहन खा. नारायण राणे यांनी उपस्थित भाजप कार्यकत्यांना केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळ माने, प्रमोद जठार, भाजप प्रवक्ते अवधूत वाघ जिल्ह्या अध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्याक्ष अशोक मयेकर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब परतलेकर यांच्यासह तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्राची कामे लोकांपर्यंत पोहोचवा...
ज्या बूथवर भाजपाला मतदान झाले नाही, त्या घराघरांत जाऊन कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांची भूमिका, केंद्राने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. परिवर्तनाची लढाई आता सुरू झाली आहे. आपल्याला ५१ टक्के मतदान कसे मिळेल, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow