मोफत वीज योजनेचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांना

Aug 5, 2024 - 10:51
Aug 5, 2024 - 11:57
 0
मोफत वीज योजनेचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांना

रत्नागिरी : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ७.५ एचपीपर्यंतचे कृषिपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना असून, एप्रिल २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने शेतकरी संकटात आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी एप्रिलपासून होणार आहे. पाच वर्षांसाठी या योजनेचा कालावधी आहे. त्यानुसार २०२९ पर्यंत जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात तीन अश्वशक्तीचे पंप वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पाच एचपी ते सात एचपीचे पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आहे. शासनाच्या वीज माफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व कृषिपंप असलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे.

सद्यस्थितीत ही योजना तीन वर्षांसाठी जाहीर करण्यात आली. तीन ते सात एच. पी. (अश्वशक्ती) चे पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज माफी जाहीर केली आहे. एप्रिल २०२४ पासून ही सवलत जाहीर केली असल्याने जिल्ह्यातील ८,८४१ ग्राहक या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, आता वीजमाफी केली आहे. शेतीपंपासाठी एकीकडे मोफत वीज दिली जात असताना, अन्य ग्राहकांसाठी विजेचे दर मात्र वाढवले आहेत.

शासनाने एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ अशा एकूण पाच वर्षासाठी मोफत विजेची घोषणा केली आहे. परंतु, तीन वर्षांनंतर आढावा घेतल्यानंतर या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. एप्रिल २०२४ पासून शेतकऱ्यांना वीज माफीची सवलत दिली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow