खेड : जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली

Jun 22, 2024 - 10:20
 0
खेड : जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली

खेड : तालुक्यात गेल्या २४ तासांत खेडमध्ये ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवार, दि. २१ रोजी सकाळी जगबुडी नदी ५ मीटर या इशारा पातळीवरून वाहत होती.

तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी १४६.९० मिलिमीटर नोंद झाली असून सोनगाव येथे एका घराची संरक्षक भिंत नजीकच्या दुसऱ्या घरावर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये गुरुवारी दि. २० पासून मुसळधार पाऊस पडत असून, येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीपात्रात पाण्याची पातळी मध्यरात्री ५. २५ मिटर झाली होती. पावसाच्या माध्यम ते मुसळधार सरी कोसळत असल्याने नदी सात मीटर या धोक्याच्या पातळीवरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. 

खेडमध्ये सोनगाव येथे घर कोसळले आहे. मुसळधार पाऊस पडत असताना सोनगाव येथे दिलीप दिवेकर यांच्या घराजवळील संरक्षक भिंत ढासळली. या भिंतीचे दगड त्यांच्या घरा जवळील विठ्ठल पारधी यांच्या घरावर कोसळून त्यांचे घर पूर्णपणे कोसळले आहे. या घटनेत एक महिला (नाव समजू शकले नाही) जखमी झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ यांनी मदत कार्य सुरू केले आहे. खेड तालुक्यात दि. २१ रोजी सकाळी ६ पर्यंत खेड शहरात ९४ मि. मि., शिर्शी मंडल १५५ मि.मी., भरणे मंडल - १०८ मिमी, आंबवली मंडल ४४ मि.मी, कुळवंडी मंडल- १०४ मि.मी., लवेल मंडल - ७१ मि.मी, धामणद १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण ३१७.१० मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 22-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow