राज्यातील १६ जलविद्युत प्रकल्पांचे होणार खासगीकरण

Aug 5, 2024 - 12:22
 0
राज्यातील १६ जलविद्युत प्रकल्पांचे होणार खासगीकरण

चिपळूण : राज्यातील ३५ वर्ष पूर्ण झालेले जलविद्युत प्रकल्प खासगी प्रवर्तकांच्या ताब्यात भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. सध्या असे १० प्रकल्प आहेत. इतर १६ प्रकल्प खासगी संस्थांना दिले जाणार आहेत. ९ प्रकल्प ऊर्जा विभागाकडे राहणार आहेत. कोयना प्रकल्पाचे चारही टप्पे सध्यातरी ऊर्जा विभागाकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प आधुनिकीकरणाच्या नावाखाली खासगी संस्थांना देण्याच्या हालचाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू होत्या, राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर हा विषय मागे पडला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस ऊर्जामंत्री झाल्यानंतर महायुती सरकारचा अंतिम कालावधी पूर्ण होत असताना हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील या सर्व जलविद्युत प्रकल्पांची दोन गटांत वर्गवारी करण्यात आलेली आहे. ज्या जलविद्युत प्रकल्पांच्या पाण्याचा वापर केवळ वीज निर्मितीसाठी होत आहे असे प्रकल्प श्रेणी-१ आणि ज्या विद्युत प्रकल्पांचा पाण्याचा वापर वीज निर्मितीसह, सिंचन, औद्योगिक आणि इतर वापर केला जातो असे श्रेणी-२ असे दोन गट करण्यात आले आहेत. यापूर्वी वीज जलविद्युत प्रकल्प महती हायड्रो पॉवर वीर प्रोजेक्ट या खासगी प्रवर्तकास दिलेला होता. याचा आधार घेत राज्य सरकार आता इतर प्रकल्प खासगी प्रवर्तकाला देत आहेत. कोयना प्रकल्पाचा टप्पा-१ आणि २ टाटा कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू होत्या. टाटा कंपनीच्या शिष्टमंडळाने या प्रकल्पाची पाहणी केली होती. त्याशिवाय प्रकल्पाचा तिसरा टप्पाही खासगी कंपनीला देण्याच्या हालचाली होत्या. मात्र, सध्या तरी हा संपूर्ण प्रकल्प ऊर्जा विभागाकडे राहणार आहे.

वीज निर्मिती प्रकल्पाचे खासगीकरण करणे हे केवळ कर्मचाऱ्यांसाठी तर सामान्य ग्राहकांसाठी सुद्धा धोक्याचे आहे. त्याचे दुष्परिणाम फार वाईट आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना आणि कामगार संघटनांसह सामान्य लोकांनी या निर्णयाचा विरोध केला पाहिजे.- हिंदुराव पाटील, मुख्य सचिव, महाराष्ट्र वीज कामगार संघटना इंटक

ऊर्जा विभागाकडे कोणते जलविद्युत प्रकल्प असणार
कोयना फेज १ आणि २
कोयना फेज ३
वैतरणा
कोयना डॅम फूट पावर
हाऊस एक
तिल्लारी
भिरा
वैतरणा
कोयना फेज-४
घाटगर

कोणते जलविद्युत प्रकल्प खासगी प्रवर्तकाला दिले जाणार
येलदारी
भाटघर
पैठण
खडकवासला पानशेत
वरसगाव
कान्हेर
भातसा
ढोम
उजनी
मानिकडोह
तेरवणमेढे
सुर्वा RBC
डिंभे
सूर्या
वारणा
दूधगंगा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow