रत्नागिरीत उभी राहणार ६५ तलाठी कार्यालये

Aug 5, 2024 - 12:39
 0
रत्नागिरीत उभी राहणार ६५ तलाठी कार्यालये

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह संपूर्ण तालुक्यातील प्रशासकीय चेहरामोहरा बदलत आहे. अनेक शासकीय आणि प्रशासकीय नवीन इमारती उभ्या राहत आहेत. काही कार्यालय इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुकानिहाय प्रशासकीय इमारतींसह गावागावांतील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारती उभ्या राहाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये तर तब्बल ६५ तलाठ्यांच्या नवीन कार्यालयांची उभारणी होणार आहे.

शासनाची प्रमुख कार्यालये असल्याने रत्नागिरी शहर हे प्रशासकीय शहर म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला शासकीय कामासाठी यायचे झाले तर त्यांना रत्नागिरीतच यावे लागते. अशावेळी येणाऱ्या प्रत्येकाला आनंददायी कार्यालय वाटावे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुशोभितेमुळे कर्तव्य बजावताना उत्साह निर्माण व्हावा यासाठी प्रशासकीय इमारतींची कल्पना पालकमंत्री उदय सामंत मांडली. त्याचबरोबर तालुकास्तरावर असणारी प्रशासकीय अनेक कार्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. तलाठ्यांचे कार्यालय म्हणून ओळखली जाणारी सजा कार्यालये तर एखाद्या खोपट्याप्रमाणे आहेत. इतर विकासकामांसोबत पालकमंत्र्यांनी याकडेही लक्ष घातले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या या प्रयत्नामुळे जिल्हा प्रशासनाची आणखी एक नवीन प्रशासकीय इमारत उभी राहत आहे. रत्नागिरी नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत काही महिन्यांतच पूर्णत्वास जाणार आहे. एसटीचे विभाग नियंत्रक कार्यालयाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या कार्यालयाचे नूतनीकरण झाले आहे. शहरातील एसटीचे मध्यवर्ती स्थानक उभारणीस वेग आला आहे. आता तर तालुकास्तरीय प्रशासकीय इमारती व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

प्रत्येकी १५ लाखांचा निधी

रत्नागिरी तालुक्यातील तब्बल ६५ तलाठी कार्यालयांच्या इमारती उभ्या राहणार आहेत. महसूल विभागाकडून पालकमंत्र्यांनी प्रत्येकी १५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या तलाठी कार्यालयांच्या इमारतींचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 05-08-2024

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow