खेड : वीस तास बेपत्ता वृद्ध सापडला चिखलात

Aug 5, 2024 - 11:31
Aug 5, 2024 - 12:33
 0
खेड : वीस तास बेपत्ता वृद्ध सापडला चिखलात

खेड : शहरातील सहजीवन हायस्कूल समोरील झमझम हाऊसिंग सोसायटीमध्ये वास्तव्य करणारे बबन हरी खेडेकर (८०) हे दि. ३ रोजी दुपारी १२ वाजता बाहेर जाऊन येतो सांगून बाहेर पडले होते. मात्र, ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला होता. रविवार दि. ४ रोजी ब्राह्मणआळी लगत असलेल्या खेडजाई देवीचा होम लागण्याच्या ठिकाणी ते रात्रभर पावसात चिखलात पडलेले आढळून आले. ही बाब माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व सोनारआळी मित्र मंडळाचे सदस्य यांना कळल्यावर त्यांनी त्यांना चिखलातून बाहेर काढून त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी नातेवाईक यांच्याकडे सुपूर्द केले.

खेड शहरातील ब्राह्मणआळी परिसरात चिखलामध्ये एक वृद्ध व्यक्ती पडल्याची घटना सोनार आळी मित्र मंडळाचे सदस्य शेखर गुहागरकर आणि मीनल गुहागरकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवार दि.४ रोजी सकाळी फोन करून माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना हा प्रकार सांगितला. वैभव खेडेकर यांनी भूषण कारेकर यांना फोन करून ही माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पोहचून ताबडतोब चिखलात उतरून त्या वृद्ध व्यक्तीला बाहेर काढले.

ही व्यक्ती शनिवारी दि.३ रोजी दुपारी बेपत्ता झालेले बबन खेडेकर (८०, रा. झमझम हाउसिंग सोसायटी, सहजीवन हायस्कूलजवळ खेड) असल्याचे समजले. शेखर गुहागरकर, भूषण कारेकर यांनी त्यांना स्वच्छ करून नातेवाईकांना कळवले. त्यामुळे खेडेकर यांच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. खेड शहरातील विसर्जन कट्टा या संस्थेचे तरुण कार्यकर्ते देखील तातडीने त्या ठिकाणी पोहोचले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow