चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रातुन पाच लाख घनमीटर गाळ काढला

Jun 1, 2024 - 15:20
 0
चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रातुन पाच लाख घनमीटर गाळ काढला

चिपळूण : चिपळूण शहराची पुरातून मुक्तता व्हावी, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. चिपळूणकरांच्या आक्रोशामुळे महापुरानंतर २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यास चालना मिळाली, त्यानंतर आता तिसऱ्या वर्षी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण सुमारे ५ लाख घनमीटर गाळ काढला आले. पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ उपसा सुरू राहणार असून ७ पोकलेन आणि १६ डंपरच्या माध्यमातून गाळ उपशाचे काम सुरू आहे.

चिपळूण शहर व परिसरात २१ जुलै २०२१ ला आलेल्या महापुराने हाहाकार माजवला होता. शहर परिसरात १० ते २० फुटापर्यंत पाणी भरले होते. महापुरानंतर गाळाने भरलेल्या वाशिष्ठीचा मुद्दा ऐरणीवर आला. चिपळूणकरांच्या आक्रोशातून चिपळूण बचाव समितीचा उदय झाला. समितीच्या माध्यमातून शहरवासीयांनी आंदोलन केले. हे आंदोलन आणि आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे २०२२ मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी यंत्रणा चिपळुणात गाळ उपशाच्या कामी लावली होती. गेल्या दोन वर्षात १२ लाख ७० हजार घनमिटर गाळ उपसा करण्यात आला.

यंदा तिसऱ्यावर्षीही गाळ उपशाचे काम सुरू आहे. पोफळी, शिरगाव, मुंढे, खडपोली, पेठमाप, उक्ताड, कोंढे आदी ठिकाणी गाळ उपसा केली जात आहे. ७ जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून ७ पोकलेन व १६ डंपर गाळ उपशासाठी कार्यरत आहेत. काढलेला गाळ हा शहरातील शासकीय जागेत, तसेच ज्या नागरिकांना हवा आहे, त्यांना तो दिला जात आहे.

या चिपळूण शहर व परिसरात २१ जुलै २०२१ ला आलेल्या महापुराने हाहाकार माजवला होता. शहर परिसरात १० ते २० फुटापर्यंत पाणी भरले होते. महापुरानंतर गाळाने भरलेल्या वाशिष्ठीचा मुद्दा ऐरणीवर आला. चिपळूणकरांच्या आक्रोशातून चिपळूण बचाव समितीचा उदय झाला. समितीच्या माध्यमातून शहरवासीयांनी आंदोलन केले. हे आंदोलन आणि आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे २०२२ मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी यंत्रणा चिपळुणात गाळ उपशाच्या कामी लावली होती. गेल्या दोन वर्षात १२ लाख ७० हजार घनमिटर गाळ उपसा करण्यात आला.

यंदा तिसऱ्यावर्षीही गाळ उपशाचे काम सुरू आहे. पोफळी, शिरगाव, मुंढे, खडपोली, पेठमाप, उक्ताड, कोंडे आदी ठिकाणी गाळ उपसा केली जात आहे. ७ जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून ७ पोकलेन व १६ डंपर गाळ उपशासाठी कार्यरत आहेत. काढलेला गाळ हा शहरातील शासकीय जागेत, तसेच ज्या नागरिकांना हवा आहे, त्यांना तो दिला जात आहे.

यावर्षी दिवाळीनंतर निधीअभावी गाळ उपशाचे काम रखडले होते. बचाव समिती आणि आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केल्यानंतर गाळ उपशासाठी निधी मिळाला. या निधीतूनच सध्या गाळ उपशाचे काम सुरू आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शहरातील शासकीय जागेत पालिकेने गाळाचा साठा केला आहे. पावसाळ्यापूर्वी तेथील जागेचे सपाटीकरण केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

गाळ उपशाचे सकारात्मक परिणाम
दोन वर्षांत वाशिष्ठीतील गाळ उपशाचे सकारात्मक परिणाम जाणवले आहेत. गतवर्षी २०० मिमी दरम्यान पाऊस झाला तरी शहरात पाणी भरण्याचे प्रकार घडले नव्हते. त्याचबरोबर पावसाळ्यात कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मितीनंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचेही नियोजन केले होते. या सर्व उपाययोजनांचा परिपाक म्हणून वाशिष्ठीला पूर आला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 01/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow