मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव झोनल स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व

Aug 7, 2024 - 10:30
 0
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव झोनल स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात प्राथमिक फेरीत २६ स्पर्धांपैकी २२ स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून ७१ पॉइंटसह रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण झोन दहामध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले.

स्पर्धेचा निकाल असा - थिएटर विभाग- एकांकिका गट-अ (मराठी):- द्वितीय क्रमांक; एकांकिका गट-ब (हिंदी):- प्रथम क्रमांक; स्कीट गट-अ (मराठी):- प्रथम क्रमांक; स्कीट गट-ब (हिंदी):- द्वितीय क्रमांक; माईम:- द्वितीय क्रमांक.

वाङ्मय विभाग- वक्तृत्व गट-अ (मराठी):- द्वितीय क्रमांक; वक्तृत्व गट-ब (English):- तृतीय क्रमांक; वादविवाद गट-अ (मराठी):- द्वितीय क्रमांक; वादविवाद गट-ब (English):- प्रथम क्रमांक.

गीतगायन- समूहगीत गायन:- प्रथम क्रमांक; वेस्टर्न समूहगीत गायन:- प्रथम क्रमांक; वेस्टर्न:- प्रथम क्रमांक

शास्त्रीय गीतगायन:- प्रथम क्रमांक; नाट्यसंगीत:- प्रथम क्रमांक; शास्त्रीय वाद्य [तालवाद्य] एकल: तालवाद्य:- प्रथम क्रमांक; शास्त्रीय वाद्य [नॉन-पर्क्यूशन] एकल: स्वरवाद्य:- प्रथम क्रमांक

फाइन आर्टस्- रांगोळी :- तृतीय क्रमांक; मेहंदी :- द्वितीय क्रमांक; पोस्टर:- तृतीय क्रमांक; क्ले मॉडेलिंग:- उत्तेजनार्थ.

नृत्य- लोकनृत्य:- उत्तेजनार्थ; शास्त्रीय नृत्य:- प्रथम क्रमांक.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेसाठी या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. तांत्रिक बाजू सांभाळणारे प्रा.शुभम पांचाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. संगीत विभागासाठी दिग्दर्शक ओंकार बंडबे व प्रा. वैष्णवी जोशी नाट्य विभाग यतीन पवार, मनोज भिसे, प्रतीक हिवाळे, लोकनृत्य हेमंत कांचन यांचे मार्गदर्शन मिळाले. वाङ्मय विभागासाठी प्रा. जयंत अभ्यंकर, डॉ.यास्मिन आवटे, नाट्य विभागासाठी प्रा. वेदांग सौंदलगेकर आणि प्रा. श्रावणी विभूते आणि फाइन आर्टस विभागासाठी प्रा. अतिका राजवाडकर यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow