रत्नागिरी : कास्ट्राईब वाहनचालक जिल्हाध्यक्षपदी नवनाथ वायदंडे यांची निवड

Aug 28, 2024 - 15:19
 0
रत्नागिरी : कास्ट्राईब वाहनचालक जिल्हाध्यक्षपदी नवनाथ वायदंडे यांची निवड

साखरपा : रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब वाहनचालक संघटनेची बैठक रत्नागिरी येथे झाली. बैठकीत नवनाथ वायदंडे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. वायदंडे हे गेली १२ वर्षे कोकण पाटबंधारेअंतर्गत विविध विभागात कार्यरत आहेत. बैठकीत जिल्हा कार्यकारिणीही घोषित करण्यात आली. यात राजन मिशाळे हे उपाध्यक्ष, अशोक चव्हाण यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून विजय विसापुरे, संतोष कदम, गजानन सावंत यांनी सहकार्य केले. संघटनावाढीसाठी तसेच संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचा मानस वायदंडे यांनी व्यक्त केला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 28/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow