खेडमध्ये आज कीटकजन्य रोग प्रतिबंधात्मक प्रशिक्षण
खेड : सध्या पावसाळ्यामध्ये कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामध्ये डेंग्यू, हिवताप, चिकुनगुणिया, लेप्टोस्पायरासीस यासारख्या आजारांचा समावेश आहे. या रोगांना प्रतिबंध करण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, याकरीता खेड नगरपरिषदेमार्फत नगर परिषद कार्यालयात दि. ७ रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी शाळा, कॉलेज, हायस्कूलमधील विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी, विद्यार्थी, नागरिकांनी या प्रशिक्षणाकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन खेड नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 07-08-2024
What's Your Reaction?