साडवलीतील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला 'उत्कृष्ट दर्जा'
देवरुख : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथील डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी फार्मा पदविका विभागास महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईमार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये या महाविद्यालयास सर्वोच्च म्हणजेच उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला आहे.
यात महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सोई-सुविधा, प्राध्यापक वर्ग, शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, एकंदरीत शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या नोकरी आणि व्यवसायाच्या संधी इत्यादी विविध बाबींचा विचार करून मूल्यांकन दिले आहे.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली, प्राध्यापिका अस्मी कदम, विभाग प्रमुख प्राध्यापक निकुल पटेल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
हे यश संपादन करण्यासाठी संस्था अध्यक्ष रवींद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा नेहा माने, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी यांचे योगदान लाभल्याबद्दल, प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 08/Aug/2024
What's Your Reaction?