चिपळूण : वडनाका येथे भटक्या श्वानांच्या हल्ल्यात बालिका जखमी

Aug 8, 2024 - 11:47
 0
चिपळूण : वडनाका येथे  भटक्या  श्वानांच्या हल्ल्यात बालिका जखमी

चिपळूण : शहरातील वडनाका येथील एका ७ वर्षाच्या बालिकेवर चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. संबंधित बालिकेला कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात सिद्धी सत्यवान गुरव (वय ७, रा. वडनाका) ही बालिका जखमी झाली आहे. ती घराजवळच्या दुकानात मैत्रिणीसोबत खाऊ नेण्यासाठी गेली असतानाच येथील भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला.

यामध्ये ही बालिका जबर जखमी झाली आहे. तिच्या पायाला जखम झाली आहे. तिला तत्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र या घटनेमुळे शहरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील अनेक भागात अनेक ठिकाणी भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना चालणं मुश्किल झालं आहे. या भटक्या कुत्र्यांचा नगर पालिका केव्हा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow