रत्नागिरी : आशादीप संस्थेत नित्या प्राणिक हीलिंगतर्फे अन्नदान

Sep 4, 2024 - 13:59
 0
रत्नागिरी : आशादीप संस्थेत नित्या प्राणिक हीलिंगतर्फे अन्नदान

त्नागिरी : येथील आशादीप संस्थेत नित्या प्राणिक हीलिंग सेंटरतर्फे अन्नदान करण्यात आले. यावेळी नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर, निशा महागावकर उपस्थित होते.

आशादीप संस्था कोणत्याही शासकीय मदतीशिवाय लोकांच्या देणग्यांमधून चालविली जाते. संस्था मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवण्याचे कार्य करत आहे. मतिमंद मुलांना समाजात योग्य स्थान मिळत नाही. आई-वडील म्हातारे होत जातात. भावंडांना आपापले व्याप असतात. अशा स्थितीत या मुलांचे संगोपन करायचे कोणी, हा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल प्रियच असते. संस्थेचे संस्थापक दिलीप रेडककर यांचा मुलगा मतिमंद आहे. या मुलाचे काय होणार, या विचाराने ते हवालदिल झाले होते. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्यासारख्याच समदु:खी पालकांचा ग्रुप त्यांनी तयार केला आणि मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळणारी 'आशादीप' ही संस्था रत्नागिरीत उभी राहिली.

या संस्थेचे कार्य लक्षात घेऊन नित्या प्राणिक हीलिंग सेंटरने संस्थेला अन्नदान करायचे ठरविले. त्यानुसार आशादीप संस्थेचे प्रमुख दिलीप रेडकर यांच्या सहकार्यातून संस्थेतील मुलांना अन्नदान करण्यात आले.प्राणिक हीलिंगविषयी अधिक माहितीसाठी नित्या प्राणिक हीलिंग सेंटर, वॉर्ड २, घर क्र. ४४५, समर्थ नगर, जोशी गोडाऊजवळ, कुवारबाव रत्नागिरी (संपर्क क्रमांक 9320333688, 9320550048) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow