चिपळुणमध्ये संस्कृत बाल केंद्राचे उद्घाटन

Aug 8, 2024 - 11:46
Aug 8, 2024 - 16:52
 0
चिपळुणमध्ये संस्कृत बाल केंद्राचे उद्घाटन

चिपळूण : येथे विद्याभारतीच्या सरस्वती विद्यामंदिर या शिशुवाटिकेमध्ये शनिवार, दि. ३ ऑगस्ट रोजी संस्कृत भारतीच्या संस्कृत बाल केंद्राचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मैत्रेयी पटवर्धन उपस्थित होत्या.

डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. माधवी जोशी यांनी स्वागत केले. स्मिता सरदेसाई आणि गायत्री पोंक्षे यांनी बालकेंद्राबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास संस्कृतभारती उत्तर रत्नागिरीच्या संस्कृत बाल केंद्र अध्यक्षा डॉ. माधवी जोशी, लवेल होते. हायस्कूलच्या संस्कृतशिक्षिका स्मिता सरदेसाई, मिताली केतकर, तसेच सरस्वती शिशुमंदिर शाळेच्या शिक्षिका पाष्टे, प्रसाद सनगरे, अमृता मोने, विद्यार्थी आणि पालक उपस्थित हे संस्कृत बाल केंद्र दर रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत सरस्वती विद्यामंदिर, विद्याभारती शिशुवाटिका, परशुरामनगर येथे ११ ऑगस्ट रविवारपासून सुरू होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow