राजापूर : खरवते ग्रामपंचायतीच्या वतीने सायकल, मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Aug 21, 2024 - 11:11
Aug 21, 2024 - 14:15
 0
राजापूर : खरवते ग्रामपंचायतीच्या वतीने सायकल, मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजापूर : तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या सायकल आणि मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खरवते ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनावेळी शालेय आणि बाह्यपरीक्षा, क्रीडास्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच मुंडगा व सर्वट या भातबियाण्यांच्या वाणांचे जतन करून भारत सरकारमार्फत पेटंट मिळवणारे त्यासोबत यावर्षी ३५ देशी भाताच्या वाणांचे संवर्धन करून लागवड केल्याबद्दल प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्यदलातील निवृत्त मेजर अनंत गुरव यांच्या मातोश्री, जिल्हा विज्ञानशिक्षक मंडळाच्या कार्यवाहीपदी निवड झाल्याबद्दल उत्कर्ष माध्यमिक विद्यामंदिर खरवते प्रशालेचे विज्ञानशिक्षक सुभाष सोकासने यांचाही सन्मान केला गेला.

या वेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण सामंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांच्या उपस्थितीत सरपंच अभय चौगुले यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौगुले, सत्यवती बावकर, वैशाली चौगुले, जान्हवी माटल, ग्रामसेविका नेहा कुडाळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, बचतगट सभासद, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा ग्रामपंचायतीतर्फे 
खरवते पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रामसेविका नेहा कुडाळी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow