चिपळुणातील चार विद्यार्थ्यांची 'साउथ एशियन म्युझिक अॅड डान्स स्पोर्ट कप' स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Aug 9, 2024 - 11:10
Aug 9, 2024 - 11:13
 0
चिपळुणातील चार विद्यार्थ्यांची 'साउथ एशियन म्युझिक अॅड डान्स स्पोर्ट कप' स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

चिपळूण : श्रीलंका येथे होणाऱ्या आशिया स्पर्धेअंतर्गत 'साउथ एशियन म्युझिक अॅड डान्स स्पोर्ट कप' २०२४ या स्पर्धेसाठी चिपळुणातीत चार विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत सात देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. कोकणातून प्रथम या चार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांची निवड झाली. स्पर्धेत भारताता सुवर्णपदक मिळण्यासाठी ते दररोज १३ ते १४ तास कसून सराव करत आहेत.

हे विद्यार्थी गुरुवारी ८ ऑगस्टला श्रीलंकेला रवाना होणार, अशी माहिती प्रशिक्षकांनी दिली. सिया कपित शिर्के (वय ८. ३री. एसपीएम परशुराम), रेहांशी बळीराम दांडेकर (९ वर्षे, चौथी एसपीएम), प्रगती विकास पवार (७ वर्षे, तिसरी मेरीमाता, खेडी), साद इम्रान शेख (१५, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, मिरजोळी) अशी आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांच्या वाटचालीची माहिती देताना महाराष्ट्र म्युझिक अॅण्ड स्पोर्ट डान्स असोसिएशनचे अध्यक्ष सूरज जाधव म्हणाले, चिपळुणातील चार विद्यार्थ्यांची प्रथमच एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. श्रीलंका येथील कैंडी शहरात १० ऑगस्टला या स्पर्धा होत आहेत. २०२२ पासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत. 

प्रगती पवार ही ६ ते ८ वर्षे वयोगटात, रेहांशी दांडेकर ही ८ ते १०, सिया शिर्के ही ६ ते ८ आणि साद शेख हा १५ वर्षांखालील गटात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत त्यांना एकदाच परफॉर्म सादर करण्याची संधी मिळणार आहे. आपल्या देशाता सुवर्णपदक मिळण्यासाठी हे विद्यार्थी गेले काही दिवस दररोज १३ ते १४ तास सराव करत आहेत. यातील प्रगती ही सिंगिंग प्रकारात तर सिया, रेहांशी आणि साद हे तिघेही डान्स प्रकारात सहभागी झाले आहेत. कोकणचे कोहिनूर ठरलेले हे खेळाडू डायडाज डान्स स्टुडिओमध्ये सराव करतात, तर प्रगती पवार ही म्युझिक आरटीएमतर्फे ऑनलाईन मार्गदर्शन घेते.

टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय स्पर्धा
या स्पर्धेत निवड होण्यासाठी कल्याण, गोवा आणि नेपाळ येथे टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या. नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने १२ सुवर्णपदके मिळवली. श्रीलंका येथे होणाऱ्या स्पर्धेत भारत, भूतान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, औलंका आणि मालदीवमधील खेळाडू सहभागी होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow