चिपळूण : सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 'निवासा'ला घरघर

Jul 23, 2024 - 10:13
Jul 23, 2024 - 13:46
 0
चिपळूण : सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 'निवासा'ला घरघर

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी निवासी संकुल शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांना नवे निवासी संकुल बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.

सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी आणि अधिकारी रात्री अपरात्री अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध होत नाहीत. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता निवासी संकुल उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. काही वर्षापूर्वी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निवासी संकुल उभारून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची तेथे राहण्याची सोय केंद्राच्या बाजूलाच करण्यात आली होती. पण, या संकुलाची डागडुजी न झाल्याने याची दुरवस्था झाली आहे. हे कर्मचारी निवास संकुल लवकरात दुरस्त करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:19 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow