फुणगुस खाडीत बुडून प्रौढाचा मृत्यू
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील खाडीमध्ये पडल्याने तालुक्यातीलच कोंडये येथील अनंत तानाजी बाल्ये (४४ वर्षे) या व्यक्तीचा मृत्यू झाला.
अनंत बाल्ये यांना दारूचे व्यसन होते. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या दरम्यान ते फुणगूस खाडीत गेले होते. मात्र, धक्यावरून त्यांचा पाय घसरल्याने ते खाडीत पडले आणि बुडाले. या घटनेत त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 09-08-2024
What's Your Reaction?