खेड : बोरज येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन

Jul 9, 2024 - 10:04
Jul 9, 2024 - 12:47
 0
खेड : बोरज येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व ज्ञानदीप महाविद्यालय बोरज यांच्या संयुक्त विद्यमाने तामिळनाडू येथील कल्पकम अणुऊर्जा प्रकल्पाचे असिस्टंट कमांडंट दिनेश लवटे यांनी 'लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध संधी' याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दिनेश लवटे यांनी स्वतःची औषधनिर्माण शास्त्र पार्श्वभूमी असूनही या पदाला पात्र होऊन कर्तव्यावर हजर होण्यापर्यंतचा प्रवास व एकूणच परीक्षा तयारी या बद्दल उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालया'चे एकूण १८० विद्यार्थी उपस्थित होते. सौ. दामिनी पोवार यांनी प्रास्ताविक केले. श्री. लवटे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, परीक्षा तयारी, विविध विभागातील लोकसेवा आयोग मार्फत उपलब्ध केंद्रीय विभाग व त्यातील नोकऱ्या या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमास डॉ. उमेशकुमार बागल, संस्था प्रतिनिधी व महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपल पाटणे उपस्थित होते. आभार डॉ. सुजित नगरे यांनी मानले. संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, सेक्रेटरी माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी व सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow