संगमेश्वर : निवे-बुद्रुक येथे चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

Aug 10, 2024 - 11:16
Aug 10, 2024 - 11:42
 0
संगमेश्वर : निवे-बुद्रुक येथे चोरी करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील निवे-बुद्रुक येथे घरात घुसून चोरी करणाऱ्या दोन युवकांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून देवरूख पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार बुधवारी (ता. ८) सायंकाळी ५ वाजण्याच्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा लक्ष्मण गावडे या बुधवारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास दोघा संशयितांनी घराच्या मागील बाजूला असलेले कुलूप तोडून प्रवेश केला. गावडे यांच्या घरात कोणीच नसताना भांड्यांचा आवाज आल्यामुळे शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी गावडे यांच्या घराकडे धाव घेतली. चोरीचा संशय आल्यामुळे ग्रामस्थांनी दोन्ही
दरवाजाच्या कड्या लावून घेतल्या. त्यामुळे घरामध्ये शिरलेले ते दोघेही अडकून पडले. देवरूख पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय पाटील, सागर मुरूडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावडे यांनी दिलेल्या तक्रारीत ३ हजाराचा तांब्याचा हंडा, २ हजाराची तांब्याची कळशी, १ हजार २४० रुपयांचे अॅल्युमिनियम तपेले, ५ अॅल्युमिनियमचे डबे, १ अॅल्युमिनियमची कढई असा एकूण ६ हजार २४० रुपयांचा माल चोरीला गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित विशाल सोनार देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयिनासही ताब्यात घेतले आहे. विशाल सोनार याला देवरूख न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow