दापोलीत कुणबी भवन बांधण्यासाठी मिळणार जागा

Aug 29, 2024 - 14:06
 0
दापोलीत कुणबी भवन बांधण्यासाठी मिळणार जागा

दापोली : कुणबी समाजाला दापोलीत कुणबी भवन बांधण्यासाठी हक्काची जागा मिळावी, अशी मागणी अनेक वर्षापासून समाजाची होती. ही मागणी आता खऱ्या अर्थान कुठेतरी पूर्ण होताना दिसत असून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी समाजाची मागणी पूर्ण केली आहे. पक्ष कोणताही असो, जिथं समाजाचे हित तिथं समाज ही भावना लक्षात घेऊन लवकरच या जागेत भूमिपूजन केलं जाईल, अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीचे अध्यक्ष रमेश पांगत यांनी दिली. तर यासाठी केदार साठे, मकरंद म्हादलेकर यांनी प्रयत्न केले, असेही पांगत यांनी सांगितले.

नियोजित जागेला कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोली असा बॅनर देखील समाजाच्या वतीने लावण्यात आला. यावेळी मुंबई, ग्रामीण सतरा गट सदस्य आणि संघाचे सदस्य रवींद्र घडवले, संदेश
टेमकर, जगदीश कलमकर, सूर्यकांत म्हैसेकर, सुधीर कांबळी, मधुकर मोहिते, उदय पारदुले, शैलेश पांगत, बाळाराम खामकर, मंगेश बारसे, चंद्रकांत पड्याळ, चंद्रकांत बुवड, गणेश गावणूक, संजय गोरीवले, मनोहर रांगले यांसह अन्य समाज बांधव उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow